पुण्यात रिक्षाचालकाच्या अंगावर कोसळले मोठे झाड !

अग्निशमन दलाच्या जवानांकडून तातडीने झाड हटवत रिक्षाचालकाची सुटका

पुणे : शहरात सध्या सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी झाड कोसळण्याच्या घटना समोर येत आहेत. पुण्यातील रास्ता पेठ, केईएम रुग्णालया समोर मोठे झाड कोसळून रिक्षाचालकाच्या अंगावर पडले होते. याठिकाणी झाडाखाली अडकलेल्या रिक्षाचालकांची सुटका करण्यासाठी घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान तात्काळ दाखल झाले.

अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने झाड हटवित रिक्षाचालकाची जखमी अवस्थेत सुटका केली. दरम्यान याठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी देखील झाली होती. या घटनेत एकूण दोन व्यक्ती जखमी झाल्या असून मियालाल जमादार (वय  80 ), संगीता नेमसे (वय 34 ) अशी त्यांची नावे आहेत.  तसेच या घटनेत पाच चारचाकी, एक रिक्षा आणि एका सायकलीचे नुकसान झाले आहे.

हि कामगिरी अग्निशमन दलाचे अधिकारी प्रकाश गोरे, तांडेल राजाराम केदारी, चालक हनुमंता कोळी, राजू शेलार, जवान चंद्रकांत आनंदास, मंगेश मिळवणे, छगन मोरे, सचिन जौजाळे, प्रताप फणसे, प्रशांत गायकर, विठ्ठल शिंदे यांनी केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.