वेब सिनेमाच्या यादीत एका मोठ्या नावाची भर  

नवी दिल्ली- सध्या जगभरासह भारतामध्ये देखील वेब सिनेमाने प्रेक्षकांना चांगलेच वेड लावले आहे. वेब सिनेमाचं हे विश्व दिवसेंदिवस वाढत असून, यामध्ये बडे कलाकारसुद्धा भूमिका साकारण्यामध्ये रुची दाखवत आहेत. आता वेब सिनेमांमध्ये काम करणाऱ्यांच्या यादीमध्ये आणखीन एका मोठ्या नावाची भर पडली असून प्रसिद्ध बॉलिवूड ‘बॉबी देओल’ नेटफिक्स ओरिजन सिनेमात काम करणार आहे.

शाहरुख खानच्या ‘रेड चिलीज एंटरटेनमेंट’ या प्रोडक्शन अंतर्गत नेटफिक्स ओरिजनल ‘क्लास ऑफ 83’ सिनेमा तयार होणार आहे. काल (सोमवार) पासून ‘क्लास ऑफ 83’ या सिनेमाच्या चित्रीकरणाला देखील सुरवात झाली आहे. हा सिनेमा एका पोलीस अधिकाऱ्याच्या जीवनावर आधारित असणार आहे. यापूर्वी ‘रेड चिलीज एंटरटेनमेंट’ प्रोडक्शन अंतर्गत ‘बार्ड ऑफ ब्लड’ सिनेमा तयार करण्यात असून, लवकरच हा सुद्धा प्रकशित होणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.