नवी दिल्ली – जागतिक संकेताप्रमाणे बुधवारी सोन्याचा दर 302 रुपयांनी कमी होऊन 46,848 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला.
तयार चांदीच्या दरातही 81 रुपयांची घट होऊन 61,031 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला.
सकाळच्या सत्रामध्ये रुपयाचे मूल्य वाढल्यामुळे सोन्याच्या दरावर परिणाम झाला असल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले.
सध्या जागतिक अर्थव्यवस्थेवर नव्या करोनाचा परिणाम होत असल्यामुळे काही काळ तरी सोन्याचे दर उच्च स्तरावर राहण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.