नवी दिल्ली : मागील काही महिन्यांपासून आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण झालेली पाहायला मिळाली. ऑगस्टच्या तुलनेत आज सोन्याच्या दरात 6820 रुपयांची घसरण झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. मार्चनंतरही सोन्याच्या किंमतीत झालेली ही सर्वात मोठी घसरण आहे. या घसरणीसह पहिल्यांदाच सोने प्रति तोळा 50 हजारांखाली आले आहे. सध्या सोन्याचा दर प्रति तोळा 49 हजार 380 आहे.
एमजीएक्सवर सोमवारी सकाळी 10.20 च्या सुमारास ऑक्टोबर वायद्याच्या सोन्याचे दर 0.14 टक्क्यांनी म्हणजेच 69 रुपयांनी घसरत 49 हजार 600. याशिवाय, एमसीएक्सवर डिसेंबर वायदा बाजारात सोन्याचे दर सध्या 0.13 टक्क्यांनी म्हणजेच 63 रुपयांनी घसरत 49,585 झाले आहेत.
दुसरीकडे, सोमवारी सकाळी चांदीच्या वायदा बाजारातील किमतींमध्ये घसरण झाली. सोमवारी सकाळी 10.35 वाजता एमसीएक्सवर डिसेंबरचा चांदीचा भाव 0.75 टक्के म्हणजे 444 रुपये घसरून 58 हजार 583 झाला. याशिवाय चांदीच्या जागतिक वायदे बाजारातही घसरण दिसून आली.
जागतिक स्तरावर सोन्याच्या किमतींबद्दल बोलायचे झाल्यास, ब्लूमबर्गच्या मते सोमवारी सकाळी सोन्याचे जागतिक वायदा बाजारातील दर 0.08 टक्क्यांनी म्हणजे 1.40 डॉलरने घसरून 1,864.90 डॉलर प्रति औंस झाले. त्याशिवाय सोन्याची जागतिक पातळीवरील किंमत सध्या प्रति औंस 1,861.11 डॉलर प्रति डॉलर आहे. जागतिक स्तरावर चांदीच्या किमतींबद्दल बोलायचे झाल्यास,एका संकेतस्थळाच्या मते, सोमवारी सकाळी, कॉमेक्सवरील चांदीचा जागतिक भाव 0.40 टक्क्यांनी म्हणजेच 0.09 डॉलर खाली घसरून 23 डॉलर प्रति औंस झाला. त्याचबरोबर चांदीच्या जागतिक बाजारभावातील किंमत 22.89 डॉलर प्रति औंस ट्रेंड होत आहे.