गोमांस घेऊन जाणारे वाहन पकडले

नगर: पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके हे शहरातून गस्त घालीत असताना नगर-औरंगाबाद रोडवर गोमांस वाहतूक करणारा पिकअप पोलिसांनी पकडला. या पिकपमध्ये तब्बल पाचशे किलो गोमांस होते. शुक्रवारी (दि.19) सायंकाळच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात हुसेन आबिद कुरेशी, शहानूर हाजी इस्माईल कुरेशी (दोघे रा. व्यापारी मोहल्ला, आंबेडकर चौक, जुने नगर तालुका पोलीस स्टेशनशेजारी) या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरुद्ध प्राणी संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, पोलीस उपअधीक्षक मिटके हे नगर-औरंगाबाद रोडवर गस्त घालित असताना एक संशयास्पद पिकअप पोलिसांनी पकडली. त्या पिकअपची पाहणी केली असता आतमध्ये गोमांस आढळून आले. पोलिसांनी 500 किलो गोमांस व एक पिकप वाहन (क्र. एमएच- 12, ईक्‍यू- 9748) जप्त करण्यात आले आहे.

याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी राजेंद्र जायभाय यांच्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोनवणे हे करीत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.