केमिकलच्या एका बॅलरची गळती झाल्याने पसरले धुराचे साम्राज

कुरकुंभ – औद्योगिक वसाहती मधील मोडेप्रो प्रा.ली. या कंपनीत रविवार (दि. २५) दुपारच्या वेळेस केमिकलने भरलेल्या एका बॅलर (ड्रम)ची गळती झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे कंपनीच्या परिसरात धुराचे लोट पसरले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कुरकुंभ औद्योगिक वसाहती मध्ये केमिकल कंपन्यांमधील स्फोट, आग लागणे, वायू गळती होणे अशा घटनांची मालीका सुरूच आहे. मागील आठवड्यात झालेल्या भीषण आगीमुळे लोकांमधील भीती संपली नाही तोवर अशी घटना घडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे. औद्योगिक वसाहतीमधील अशा वारंवार घडत असलेल्या घटनांमुळे लोकांमधून नाराजीचे सूर उमटत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)