शिरूर : शिरूर बाह्य महामार्गावर पुणे- अहमदनगर रस्त्यावर ऑक्सीगोल्ड टॉकीजच्या समोर अज्ञात वाहनाच्या धडकेत अंदाजे ४५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. याबाबत रमेश पांडुरंग चैधरी, (वय ६५ वर्षे व्यवसाय मजुरी, रा. सतराकमान पुलाजवळ शिरूर) यांनी फिर्याद दिली आहे.अज्ञात चालकाविरूध्द शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेली माहिती पुढीलप्रमाणे दि. १८ सप्टेंबर रोजी पहाटे साडेतीन वाजण्याचे पुर्वी शिरूर बाह्य पुणे – नगर महामार्गावर ऑक्सीगोल्ड टॉकीजचे समोर पुणे अहमदनगर हायवे रोडवर अहमदनगर बाजुकडे जाणाऱ्या लेनवर एक ४५ वर्षीय व्यक्तीला एक अज्ञात वाहन चालकाने जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती कि या धडकेत त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला.
याबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अंमलदार प्रताप टेंगले करीत आहे.