बिहार निवडणुकांमध्ये नितीश कुमारांना टक्कर देणार लंडनमधील ‘ही’ तरुणी

पाटणा : बिहारमध्ये यावर्षी विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. या पार्श्वभूमीवर बिहारच्या राजकारणात एका नव्या चेहऱ्याचा उदय झाला आहे. लंडनमध्ये शिकलेल्या प्रिया चौधरी यांनी स्वत:ला ‘मुख्यमंत्री पदाची उमेदवार’ घोषित केले आहे. यामुळे जेडीयू नेता नितीश कुमार, आरजेडी नेता तेजस्वी यादव बिहारच्या आणि आता प्रिया चौधरी असे एकूण तिघे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असणार आहेत.

कोण आहे प्रिया चौधरी?

प्रिया जनता दल युनायटेडचे नेते विनोद चौधरी यांची कन्या असून त्या सध्या लंडनमध्ये आहेत. त्यांनी लंडनमध्ये स्कुल ऑफ इकोनॉमिक्‍स अँड पोलिटिकल सायन्स येथून लोक प्रशासनामध्ये एम.ए. केले आहे. याशिवाय डेव्हलपमेंट स्टडीमध्येही एम.ए. पूर्ण केले आहे.

वृत्तपत्रांमध्ये आगामी  बिहारमधील विधानसभा निवडणूक आपण लढवणार असल्याचे प्रिया यांनी जाहिरातीद्वारे घोषित केले आहे. या जाहिरातीनुसार, प्रिया चौधरी यांनी प्युरल्स नावाचा पक्ष स्थापन केला आहे.’या पक्षाचे ‘एव्हीवन गव्हर्न्स’ असे घोषवाक्य आहे. बिहारवर प्रेम आहे पण राजकारणाचा द्वेष करता? तर शामिल व्हा सर्वात पुढारलेल्या विचारांच्या पक्षामध्ये, अशी ओळ पक्षाच्या नावाखाली लिहिण्यात आली आहे.

या जाहिरातीमध्ये प्रिया यांनी म्हंटले कि, बिहारला आणखीन चांगलं मिळणं अपेक्षित आहे आणि ते शक्य आहे. तुम्ही शिड्या चढा आणि आम्ही सापांशी संघर्ष करु. तसेच मी मुख्यमंत्री झाल्यास २०२५ पर्यंत बिहार हे देशातील सर्वात प्रगत राज्य असेल. तसेच २०३० पर्यंत युरोपातील राज्यांप्रमाणे बिहारमधील कारभार होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.