धूत कंपनी परिसरातील कामगार महिलेचीसुध्दा कोरोनावर मात
वाघोली (प्रतिनिधी) : बाईफ रोड येथील संभाजीनगर परिसरातील १६ वर्षीय मुलगी कोरोनावर मात करून घरी परतली आहे. तिचे वडील देखील कोरोना पॉजिटिव्ह सापडले होते. वडील यशस्वी उपचार घेऊन पाच दिवसापूर्वीच घरी परतले होते. मुलगी देखील घरी परतल्याने बाईफ रोडचा संभाजीनगर परिसर कोरोनामुक्त झाला आहे.
वाघोली-भावडी रोडवर असणाऱ्या धूत कंपनी परिसरातील कामगार महिला कोरोनावर मात करून घरी परतली आहे. प्रसूतीसाठी ससून हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर तपासणीमध्ये महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. तिने एका बाळाला देखील जन्म दिला असून बाळ कोरोना निगेटिव्ह आले होते.