विमान प्रवासात 15 इंचाच्या मॅकबुक प्रो लॅपटॉपवर बंदी

ऍपलनेही परत मागवले लॅपटॉप
न्युयॉर्क: विमान प्रवासात 15 इंचाचे मॅकबुक प्रो लॅपटॉप सोबत बाळगू नका अशी विनंती येथील नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) हवाई प्रवाशांना केली आहे. त्यातच बॅटरी खूप जास्त गरम होत असल्याने ऍपलनेही संबंधीत लॅपटॉप परत मागवले आहेत.

मॅकबुक प्रो ची जुनी मॉडेल्स विमान प्रवासात सोबत बाळगण्यावर अनेक आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांनी बंदी घातली आहे. या लॅपटॉपची बॅटरी मोठया प्रमाणावर गरम होते. त्यामुळे आग लागण्याचा धोका आहे. त्यामुळे हॅंड बॅग किंवा अन्य सामानासोबत 15 इंचाचे मॅकबुक प्रो लॅपटॉप आणू नये अशी विनंती डीजीसीएने हवाई प्रवाशांना केली आहे.
जून महिन्यात ऍपलने बिघाड असलेले 15 इंचाचे मॅकबुक प्रो लॅपटॉप परत मागवले होते. लॅपटॉपची बॅटरी गरम होत असल्याच्या 26 तक्रारी मिळाल्याचे ऍपलकडून सांगण्यात आले. सप्टेंबर 2015 ते फेब्रुवारी 2017 मध्ये विक्री झालेल्या 15 इंचाच्या मॅकबुक प्रो लॅपटॉपमध्ये ही समस्या असण्याची शक्‍यता आहे.

 

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.