भोपाळमधील अनेक रिक्षा चालकांचे नीच कृत्य
भोपाळ : जुने शहर भागात एका 13 वर्षीय मुलीवर अंमली पदार्थ देत अनेक रिक्षाचालकांनी बलात्कार केला. हा प्रकार जवळपास सहा महिने सुरू होता.
आपल्या आजी सोबत ही मुलगी निशातपुरा भागात रहात होती. आजीशी वाद झाल्याने तीने घर सोडले. ती हनुमानगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका बस स्थानकावर गेली. तेथे अभय नावाच्या रिक्षाचालकाशी तीची मैत्री झाली.
त्याने तिला गांजा ओढायला देऊन तिला निर्जन स्थळावर नेऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तो तिला नेहमी गांजा देऊन बलात्कार करू लागला.
त्यानंतर या मुलीची ओळख त्याने अन्य काही रिक्षाचालकांशी करुन दिली. तेही नियमितपणे गांजा आणि अन्य अंमली पदार्थ देऊन तिच्यावर बलात्कार करू लागले.
ती अंमली पदार्थाच्या व्यसनांच्या आधीन झाली. अंमली पदार्थ मिळाले नाही तर ती हिंसक होऊ लागली. त्यामुळे तिच्या वर्तनातील फरक पाहून चाईल्ड हेल्पलाईनशी संपर्क साधण्यात आला. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.