शबरीमला : येथे भगवान अयप्पाच्या दर्शनाला आल्यानंतर 12 वर्षीय मुलीला प्रवेश नाकारण्यात आला. ही मुलगी पुदुचेरी येथून आली होती.
दर्शनासाठी नाव नोंदवताना या मुलीचर वय 10 असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र पोलिसांनी तीचे आधार कार्ड तपासले. त्यात तिचे वय 12 असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे शबरीमला येथील स्थितीची तिच्यासोबत असलेल्यांना कल्पना देण्यात आली. त्यानंतर तिचे वडील व अन्य नातेवाईक दर्शनासाठी पुढे रवाना झाले. दरम्यान कर्नाटकमधून आलेल्या एका नऊ वर्षीय मुलीने आम्ही दर्शनासाठी 50 वर्ष थांबायला तयार आहोत, असा फलक गळ्यात लटकावत मंदिाराच्या परंपरांना पाठींबा दिला. तिने तीनदा अयप्पा भगवानांचे दर्शन घेतले आहे. आता 50 नवर्ष पूर्ण झाल्यानंतर येण्याचे तीने ठरवले आहे, असे तिच्या पालकांनी सांगितले.
दरम्यान, सोमवारी अन्य दोन महिलांन दर्शना जाण्यापासून रोखण्यात आले. या मंदिरात रजस्वला स्त्रियांना प्रवेश दिला न जाण्याची परंपरा आहे. त्याविरोधात आंदोलन करण्यात आले होते. सर्वोच्च न्यायलयाने समानतेच्या निकषावर या मंदिरात महिलांना प्रवेश देण्याचा आणि त्या महिलां भाविकांना संरक्षण देण्याचा निर्णय दिला होता. त्यावर सात जणांच्या खंडपीठाकडे समानतेच्या मुद्द्यावरील धार्मिक प्रवेशाची प्रकरणे सोपवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायलयाने 3:2 असा विभाजित निकाल दिला होता. मात्र त्यात आधीच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली नाही. त्यामुळे याबाबत संदिग्धता आहे. कम्युनिस्ट पक्षाने याबाबत सावध भूमिका स्वीकारली आहे.