न्हावरे -येथील एका खासगी डॉक्टरचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती न्हावरे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल कराळे यांनी दिली.
येथील खासगी डॉक्टरला मंगळवारी (दि. 4) कणकण व खोकला जाणवू लागल्याने त्यांनी शिरूर रुग्णालयात जाऊन तपासणी केली त्याचा अहवाल गुरुवारी (दि. 6) रात्री पॉझिटिव्ह आला आहे.
डॉक्टरच्या कुटुंबातील आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना होमक्वारंटाइन करण्यात आले आहे.