शिक्रापूर -येथे एका कंपनी कामगाराला करोनाची लागण झाली होती. त्याच्या संपर्कातील 11 जणांचे स्वॅब तसाणीसाठी घेतले होते. त्यातीला एकाच कुटुंबातील 6 जण पॉझिटिव्ह यात तीन वर्षीय बालकाचाही समावेश आहे. इतर पाच जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र शिंदे यांनी दिली आहे.
शिक्रापूरसह परिसरातील अनेक गावांमध्येबाधितांची संख्या वाढत असून नागरिकांनी घाबरून न जाता, मास्कचा वापर करावा, असे आवाहन तळेगाव ढमढेरे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ प्रज्ञा घोरपडे यांनी केले आहे.