रेडा – इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथील नरसिंह प्रतिष्ठानच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त घेतलेल्या तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत लहान गटात तरंगवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या राजवर्धन संतोष काळे याने, मध्यम गटात सराटी येथील जिजामाता विद्यालयाच्या रमेश विघ्नेश कोरटकर याने तर मोठ्या गटात भवानीनगर येथील छत्रपती हायस्कूलच्या अक्षय माणिक चवरे याने प्रथम क्रमांक मिळवला.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या श्री केतकेश्वर विद्यालय आयोजित केलेल्या स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्रक इंदापूर पंचायत समितीच्या सभापती पुष्पा रेडके, नेचर डिलाईट डेअरीचे संचालक डॉ. ज्योतीराम देसाई, नरसिंह प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मच्छिंद्र चांदणे, युवक नेते महिंद्र रेडके यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
यावेळी इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षकांच्या पतसंस्थेचे माजी अध्यक्ष किरण म्हेत्रे, संतोष हेगडे, आदेश बनकर, दिलीप कांबळे, संजय कुलकर्णी, मोहन इंगळे, सुरेखा अभंग, स्वाती राऊत यांचा सन्मान करण्यात आला. सहभागी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक देण्यात आले. नृसिंह प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मच्छिंद्र चांदणे यांनी स्वागत केले.