IPL 2024 , Angry MS Dhoni : एमएस धोनी आयपीएल 2024 मध्ये आतापर्यंत नाबाद आहे. धोनीने या स्पर्धेतील 6 डावांमध्ये फलंदाजी केली आहे, ज्यामध्ये त्याला कोणीही बाद करू शकले नाही. लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध खेळल्या गेलेल्या स्पर्धेतील 39 व्या सामन्यात धोनीने 20 व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर चौकार मारला होता.
आता लखनऊ विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये धोनी थेट सामन्यात कॅमेरामनवर बाटली फेकण्याचे हावभाव करताना दिसत आहे.
Dhoni to Cameraman 😂😂#MSDhoni #CSKvsLSG #IPL2024 #MSDhoni #ruturajgaikwad pic.twitter.com/ue2b1MxUgH
— Tanay (@tanay_chawda1) April 23, 2024
व्हिडिओमध्ये दिसत आहे की, धोनी ड्रेसिंग रुममध्ये काचेच्या भिंतीतून उभा असलेला दिसतो. ड्रेसिंग रूममध्ये कॅमेरामन याने धोनीला पाहताच कॅमेरा त्याच्याकडे वळवला आणि धोनी टीव्हीवर लाइव्ह दिसतो. कॅमेरा आपल्या दिशेने येत असल्याचे पाहून धोनीने हातातली बाटली फेकली आणि त्याला मारण्याचे हावभाव केले. यादरम्यान धोनीला हे लक्षात येताच लगेचच तो त्याच्या लांब केसांवर हात फिरवतो. एवढाच व्हिडीओ सोशल मडियावर व्हायरल होत असून त्यामागचे नेमकं कारण स्पष्ट झालेलं नाही.
Dhoni to Cameraman 😂😂#MSDhoni #CSKvsLSG #IPL2024 #MSDhoni #ruturajgaikwad pic.twitter.com/ue2b1MxUgH
— Tanay (@tanay_chawda1) April 23, 2024
लखनौविरुद्धचा गमावला सामना अन् टॉप-4 मधूनही CSK बाहेर…
लखनऊ विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला 6 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला होता. चेपॉक येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने 20 षटकात 4 विकेट गमावत 210 धावा केल्या. संघासाठी कर्णधार रुतुराज गायकवाडने 60 चेंडूत 12 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 108* धावांची सर्वात मोठी खेळी खेळली. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौ संघाने 19.3 षटकांत 4 गडी राखून विजय मिळवला. लखनौसाठी, मार्कस स्टॉइनिसने 63 चेंडूंत 13 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 124* धावांची खेळी केली.
या पराभवानंतर चेन्नई सुपर किंग्जचा संघ गुणतालिकेत टॉप-4 मधून बाहेर पडला आहे. लखनौविरुद्धच्या सामन्यापूर्वी चेन्नईने टॉप-4 मध्ये स्वतःला कायम राखले होते. रुतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील सीएसकेला लखनौविरुद्धच्या सामन्यात या मोसमातील चौथा पराभव पत्करावा लागला.