BJP MP Rajveer Diler Death: उत्तर प्रदेशातील हाथरस येथील भाजप खासदार राजवीर दिलर यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. उपचारासाठी त्यांना अलीगढ येथील ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले, तेथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे भाजपमध्ये शोककळा पसरली आहे. ( bjp mp rajveer diler dies)
कोण होते राजवीर दिलेर?
राजवीर दिलेर हाथरसचे खासदार होते. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली आणि विजय मिळवला. यावेळी भारतीय जनता पक्षाने राजवीर दिलेर यांचे तिकीट रद्द करून त्यांच्या जागी हाथरसमधून अनूप वाल्मिकी यांना उमेदवारी दिली आहे. राजवीर दिलेर 2017 मध्ये आमदार झाले, पण लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर त्यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. राजवीर दिलेर यांचे वडील किशनलाल दिलेर हे 1996 ते 2004 पर्यंत हाथरसचे खासदार होते.
राजवीर दिलेर पक्षाच्या कार्यक्रमात सहभागी होत असत –
भाजपकडून तिकीट न मिळाल्याने राजवीर दिलेर चिंतेत असले तरी त्यांनी पक्षाचे काम करणे सोडले नव्हते. हातरस आणि अलीगढच्या कार्यक्रमात ते सहभागी होत असत. दोन दिवसांपूर्वी अलिगडमध्ये पीएम मोदींची जाहीर सभा झाली, ज्यामध्ये राजवीर दिलेर पंतप्रधानांसोबत मंचावर उपस्थित होते.
मुख्यमंत्री योगींनी व्यक्त केला शोक –
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी X वर पोस्ट करून राजवीर सिंग दिलेर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. ते म्हणाले की, हाथरस लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजवीर सिंग दिलेर यांचे अकाली निधन हे भाजप परिवारासाठी अत्यंत दु:खद आणि कधीही भरून न येणारे नुकसान आहे. शोकाकुल कुटुंबासोबत माझ्या संवेदना आहेत. शोकाकुल कुटुंबीयांना व त्यांच्या समर्थकांना हे अपार दु:ख सहन करण्याची शक्ती देवो, हीच प्रभू श्री राम चरणी प्रार्थना. ओम शांती
हाथरस लोकसभा क्षेत्र से सांसद श्री राजवीर सिंह दिलेर जी का असामयिक निधन अत्यंत दुःखद एवं भाजपा परिवार के लिए अपूरणीय क्षति है।
मेरी संवेदनाएं शोक संतप्त परिजनों के साथ हैं।
प्रभु श्री राम से प्रार्थना है कि दिवंगत आत्मा को अपने श्री चरणों में स्थान तथा शोकाकुल परिजनों और उनके…
— Yogi Adityanath (मोदी का परिवार) (@myogiadityanath) April 24, 2024