NCP SharadChandra Pawar Party Star Campaigners – शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड आदींचा देखील समावेश आहे.
तसेच भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात असलेले एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे यांचा देखील यादीत समावेश करण्यात आला आहे.
शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या नेत्यांचा देखील समावेश करण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने ज्यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे,
यामध्ये पी. सी. चाको, सोनिया दुआन यांना स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये स्थान देण्यात आलेले आहे. याव्यतिरिक्त आमदार राजेश टोपे, आमदार रोहित पवार प्राजक्त तनपुरे, रोहित आर. पाटील यांना देखील स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये स्थान देण्यात आलेले आहे.
गेल्या काही दिवसांपासून आमदार एकनाथ खडसे पुन्हा एकदा भाजपमध्ये घर वापसी करणार असल्याची चर्चा रंगली आहे. एकनाथ खडसे हे त्यासाठी दिल्लीला रवाना झाले असल्याच्या बातम्या देखील समोर आल्या आहेत. असे असतानाही शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये एकनाथ खडसे यांना स्थान देण्यात आले आहे.
एकनाथ खडसेच नाही तर एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना देखील स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये स्थान देण्यात आले आहे. एकनाथ खडसे यांच्या सून रक्षा खडसे यांना भारतीय जनता पक्षाच्या वतीने लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.
त्यामुळे एकनाथ खडसे हे पुन्हा एकदा भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. रक्षा खडसे यांनी देखील तसे स्पष्ट संकेत दिले होते.
जुनी नावे नसल्याने नवीन नावांना संधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फुट पडल्यानंतर पक्षाचे अनेक प्रमुख नेते हे अजित पवार यांच्यासोबत सत्तेमध्ये सहभागी झाले आहेत. त्यामुळे स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये नेहमीच्या जुन्या नावांचा समावेश दिसत नाही. त्यामुळे शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्ट्रार प्रचारकांच्या यादीमध्ये अनेक नवीन नावांना संधी यावेळी मिळाली आहे.
यामध्ये कुमारी सक्षणा सलगर यांच्यासह पूजा मोरे यांनादेखील स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये स्थान मिळाले आहे. याचबरोबर महबूब शेख, जावेद हबीब यांचा देखील स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे.
स्टार प्रचारक यादीत या नावांचा समावेश
अमोल कोल्हे, निलेश लंके, राजेश टोपे, एकनाथ खडसे, रोहिणी खडसे यांचा देखील समावेश आहे. याशिवाय, फौजिया खान, पी. सी. चाको, धीरज शर्मा, वंदना चव्हाण, धीरज शर्मा, सिराज मेहंदी, सोनिया दुहान, शब्बीर विद्रोही, यशवंत गोसावी, बाळासाहेब पाटील, पार्थ पोळके,
ऍड. जयदेव गायकवाड, शशिकांत शिंदे, अशोक पवार, अरुण लाड, प्राजक्त तानपुरे, सुनील भुसार, नसीम सिद्दीकी, विकास लवंडे, रोहित पाटील, राजू आवळे, मेहबूब शेख, प्रकाश गजभिये, पंडित कांबळे, रवी वरपे, नरेंद्र वर्मा, राज राजापूरकर, संजय काळबांडे, जावेद हबीब, सक्षणा सलगर आणि पूजा मोरे यांचा समावेश आहे.