India Alliance | Modi government | Lok Sabha Election 2024 – दिल्लीच्या रामलिला मैदानावर विरोधी इंडिया आघाडीने आज जोरदार शक्ती प्रदर्शन करीत मोदी सरकारच्या विरोधात एल्गार पुकारला आहे. आम्ही या सरकारच्या हुकुमशाही प्रवृत्तीच्या विरोधात एकजुटीने लढा देऊ. या लढ्यात आम्ही जिंकू आणि देशातील लोकशाही वाचवू असा निर्धार या सभेतील नेत्यांनी व्यक्त केला आहे. । India Alliance | Modi government | Lok Sabha Election 2024
या सभेला इंडिया आघाडीतील तब्बल २६ पक्षांचे नेते उपस्थित होते. त्यात सोनिया गांधी, मल्लिकार्जून खर्गे, राहुल गांधी, अखिलेश यादव, उद्धव ठाकरे, शरद पवार, तेजस्वी यादव, डी राजा, सीताराम येचुरी, मेहबुबा मुफ्ती, तृणमुल कॉंग्रेसचे नेते डेरेक ओब्रियन, फारूख अब्दुल्ला, द्रमुक पक्षाचे तिरूची शिवा तसेच आम आदमी पक्षाचे अनेक नेते उपस्थित होते.
सर्वांनीच एकजुटीने मोदींच्या हुकुमशाहीच्या विरोधात एकजुटीने लढा देण्याचा निर्धार करून देशावर आलेले संकट दूर करण्याचा निर्धार केला. सध्या अटकेत असलेले झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन, आणि अटकेत असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांची उपस्थिती या सभेचे मुख्य आकर्षण होते. त्या दोघींनीही यावेळी जोरदार भाषण केले.
यावेळी बोलताना राहुल गांधी म्हणाले की, “भाजपने केंद्रीय यंत्रणांना हाताशी धरून या निवडणुकीचे मॅच फिक्सींग केले आहे. त्यांनी हे मॅचफिक्सींक करून निवडणुका जिंकल्या आणि देशाच्या घटनेला हात लावला तर देशात आग लागेल असे ते म्हणाले. कॉंंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे म्हणाले की या देशात लोकशाही हवी की हुकुमशाही याचा निर्णय घेण्याची वेळ आली असून हुकुमशाहीला समर्थन देणाऱ्यांना या देशातून हाकलून लावले पाहिजे.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी म्हणाले की आमच्या सभेने देशात एक नवीराजकीय उर्जा निर्माण झाली आहे. त्यातून देशाच्या दुसऱ्या स्वातंत्र्य लढ्याची हाक दिली गेली असून आपण ही लढाई जिंकणार आहोत आणि दुसरे स्वातंत्र्य प्राप्त करणार आहोत असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. । India Alliance | Modi government | Lok Sabha Election 2024