मुंबई – गरज पडल्यास पासपोर्ट व्हेरिफिकेशन (passport verification) साठी अर्जदाराच्या घरी भेट देऊन माहिती घ्या अशी सूचना राज्याच्या गृह विभागाने (Home Department) पोलिसांना (police) केली आहे. देशविरोधी कारवाया करणाऱ्यांना पासपोर्ट जारी करणे रोखण्यासाठी तसेच बेकायदेशीर स्थलांतर रोखण्यासाठी ही सूचना करण्यात आली आहे.
बेकायदेशीर परदेशी स्थलांतरितांना बनावट आधार आणि पॅन कार्ड जारी करण्यात केंद्रीय एजन्सी संघटित टोळ्यांचा सहभाग असल्याचे उघड झाल्याने पोसपोर्ट व्हेरीफिकेशन व्यवस्थीतरित्या होण्याची गरज या आदेशात व्यक्त करण्यात आली आहे.
ईशान्येकडील राज्यांचे पत्ते देऊन तसेच बनावट कागदपत्रे सादर करून पासपोर्ट मिळवण्याचे प्रमाण सध्या वाढले आहे. याच आधारावर तात्काळ पासपोर्ट सुविधेचाही गैरवापर केला जात असल्याचे निदर्शनाला आले आहे असे गृह विभागाचे म्हणणे आहे.