पुणे – गणेशोत्सवानिमित्त (Pune Ganeshotsav) रोषणाई व देखावे पाहण्यासाठी शहरातील व बाहेरील नागरिक मोठ्या प्रमाणात येत असतात. येणाऱ्या गणेशभक्तांना सोय व्हावी म्हणून 19 ते 29 सप्टेंबर दरम्यान शहरातील मध्य भागात 26 ठिकाणी वाहने निशुल्क पार्क करता येणार आहे. गणेश विसर्जनाच्या दिवशी सुद्धा या ठिकाणी वाहने पार्क करता येणार आहेत.
उपलब्ध पार्किंग ठिकाण आणि वाहनांचा प्रकार (vehicle parking)
१) न्यू इंग्लिश स्कुल रमणबाग – दुचाकी
२) शिवाजी आखाडा वाहनतळ- दुचाकी आणि चारचाकी
३) देसाई कॉलेज – पोलीस पार्किंग
४) हमालवाडा, पत्र्यामारुती चौकाजवळ- दुचाकी आणि चारचाकी
५) गोगटे प्रशाला – दुचाकी
६) एसपी कॉलेजे – दुचाकी
७) नदी पात्रा लगत – दुचाकी आणि चारचाकी
८) शिवाजी मराठा शाळा – दुचाकी
९) नातूबाग- दुचाकी
१०) पीएमपी मैदानपूरम चौकाजवळ – दुचाकी
११) पेशवे पार्क सारसबाग – चारचाकी
१२) हरजीवन हॉस्पिटल समोर सावरकर चौक – दुचाकी
१३) पाटील प्लाझा पार्किंग -दुचाकी
१४) मित्रमंडळ सभागृह – दुचाकी
१५) पर्वती ते दांडेकर पूल – दुचाकी
१६) दांडेकर पूल ते गणेशमळा – दुचाकी
१७) गणेशमळा ते राजाराम पूल – दुचाकी
१८) निलायम टॉकीज – दुचाकी आणि चारचाकी
१९) विमलाबाई गरवारे हायस्कुल – दुचाकी आणि चारचाकी
२०) आबासाहेब गरवारे कॉलेज – दुचाकी आणि चारचाकी
२१) संजिवनी मेडिकल कॉलेज मैदान – दुचाकी आणि चारचाकी
२२) आपटे प्रशाला – दुचाकी
२३) फर्ग्युसन कॉलेज – दुचाकी आणि चारचाकी
२४) जैन हॉस्टेल बीएमसीसी रोड मैदान – दुचाकी आणि चारचाकी
२५) मराठवाडा कॉलेज – दुचाकी
२६) एसएसपीएमएस कॉलेज – दुचाकी