मुंबई – भारताचा माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनी फोनपासून सहसा दूरच असतो. अनेकदा धोनीला संप्रर्क करण्यासाठी त्याच्या जवळच्या व्यक्तीला अथवा मॅनेजरला संपर्क करावा लागतो. अनेकदा धोनी फोनवर बोलणं देखील टाळतो. मात्र नुकतंच धोनीचा विमान प्रवासातील एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये चक्क धोनी आपल्या टॅबलेटवर गेम खेळत असल्याचे दिसते.
धोनीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. इंडिगोच्या फ्लाइटमध्ये टॅबलेटवर गेम खेळताना दिसत होता. यावेळी एका एअर होस्टेसने त्याला चॉकलेटने भरलेला ट्रे देऊन त्यातील चॉकलेट घेण्यास सांगते. यासह एक चिठ्ठी देखील धोनीला यावेळी देते. ते वाचून माही हसतो आणि चॉकलेटचे एक पॅकेट उचलतो. नेटकऱ्यांचं लक्ष मात्र धोनी टॅब्लेटवर खेळात असलेल्या कँडी क्रश गेमकडे गेले. त्यानंतर अनेकांनी सोशल मिडीयावर कँडी क्रश हॅशटॅग वापरात धोनीला टॅग केल्याचे पाहायला मिळाले. यामुळे कँडी क्रश गेमची शेअर्स प्राईझ देखील वाढल्याचे नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर म्हंटले आहे.
धोनीचा हा व्हिडिओ रविवारचा असून तो इकॉनॉमी क्लासमध्ये प्रवास करत होता. तर त्या एअर होस्टेसचे नाव नितिका आहे आणि तिने स्वतः हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. एअर होस्टेसने धोनीला मिठाई आणि चॉकलेट देऊ केले. यावर धोनीने ‘ओमानी डेट्स’चे पॅकेट उचलले आणि बाकीचे परत घेण्यास सांगितले. यानंतर ती एअर होस्टेस धोनीशीही बोलते आणि नंतर ड्युटीवर परतते. धोनीसोबत त्याची पत्नी साक्षीही यावेळी असल्याचे समजते.
Dhoni carry Mobile / tablet just to play Games . pic.twitter.com/k6gcoEh7qU
— MAHIYANK ™ (@Mahiyank_78) June 25, 2023
गेल्या महिन्यात चेन्नई सुपर किंग्जला पाचव्या आयपीएल विजेतेपदावर नेल्यानंतर धोनीच्या गुडघ्यावर 1 जून रोजी शस्त्रक्रिया झाली. त्याच्या डाव्या गुडघ्याला दुखापत होती तरीही त्याने संपूर्ण सीजन खेळला. विकेटकीपिंग करताना तो लंगडत चालताना दिसला देखील होता. अशा परिस्थितीत धोनीने आयपीएलनंतर मिळालेल्या वेळेत पहिल्यांदा गुडघ्यावर शस्त्रक्रिया केली.