२ हजाराची नोट मागे का घेण्यात येत आहे?
२ हजाराची न मागे घेण्याच्या निर्णयामागे क्लीन नोट पॉलिसी असल्याचं आरबीआयतर्फे सांगण्यात आलं आहे. तसेच २०१६ च्या नोटबंदीच्या निर्णयानंतर बाजारात चलनाचा तुटवडा निर्माण होऊ नये या उद्देशासह २ हजाराची नोट बाजारात आणण्यात आली होती. आता इतर चलनी नोटांच्या माध्यमातून बाजारात आवश्यक चलन उपलब्ध आहे. ही नोट जारी करण्याचा उद्देश पूर्ण झाला असल्याने २ हजारांची नोट मागे घेत असल्याचे आरबीआयने म्हंटले आहे.
२ हजारांची नोट व्यवहारातून बाद होणार आहे का?
तर याच उत्तर नाही असं आहे. २ हजारांची न व्यवहारातून बाद करण्यात आलेली नाहीये. आरबीआयने क्लीन न पॉलिसीच्या अंतर्गत ही न यापुढे छापणार नसल्याचं म्हटलंय. यासोबतच २ हजारांची नोट ३० सप्टेंबरपर्यंत बदलून घ्या अशी सूचनाही आरबीआयने दिली आहे. मात्र चलन म्हणून ही नोट यापुढेही वापरता येईल असं आरबीआय सांगतं.
२ हजारांची नोट वापरून व्यवहार करता येणार?
आरबीआयने दिलेल्या गाईडलाईन्स नुसार २ हजारांची न वापरून तुम्ही कोणताही व्यवहार करू शकता. तुम्ही या नोटा स्वीकारू शकता, तसेच खर्चही करू शकता. आरबीआय तुम्हाला या नोटा बदलून घेण्यासं प्रोत्साहित करत आहे. त्यासाठी ३० सप्टेंबर ही मुदत देखील देण्यात आली आहे. मात्र नोटा बदलून घेणे अनिवार्य असल्याचं आरबीआयतर्फे कोठेही म्हणण्यात आलेलं नाही.
तुमच्याकडे २ हजारांची न असल्यास काय कराल?
आरबीआयने सांगितल्या नुसार, तुमच्याकडे २ हजारांची न असल्यास तुम्ही तुमच्या जवळच्या बँक शाखेमध्ये जाऊन ३० सप्टेंबर २०२३ पूर्वी, ही रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा करू शकता अथवा बदलून घेऊ शकता. आरबीआयच्या १९ प्रादेशिक कार्यालयांमध्ये देखील ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
किती रक्कम बँक खात्यावर भरू शकता?
आरबीआयने यावर कोणतेही निर्बंध लावले नसून तुमच्या बँक खात्याच्या प्रकारानुसार अथवा बँकेने घालून दिलेल्या मर्यादेपर्यंत रक्कम जमा करू शकता, असेही आरबीआयतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
एकावेळी किती रक्कम भरता येणार?
आरबीआयने याबाबत नियम घालून दिला असून एकावेळी २० हजार रुपये इतकी रक्कम बँक खात्यात जमा करता येणार आहे अथवा बदलून घेता येणार आहे. हा नियम बँकेमधील इतर व्यवहार सुरळीत चालावे यासाठी घेण्यात आल्याचं स्पष्टीकरणही आरबीआयने दिलं आहे.