हिमाचल प्रदेश – इंडियन प्रीमियर लीग 2023 च्या हंगामातील आजचा सामना पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स असा रंगणार असून हा सामना धर्मशाला येथील एचपीसीए स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या हंगामात दोन्ही संघ दुसऱ्यांदा आमने सामने येणार आहेत. पहिल्या टप्प्यात या दोन संघांमध्ये दिल्लीच्या मैदानावर सामना झाला होता ज्यात पंजाब किंग्जच्या संघाने दिल्ली कॅपिटल्सचा 31 धावांनी पराभव केला आहे.
सध्या दिल्ली कॅपिटल्स संघ गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर आहे याचाच अर्थ असा कि ते प्लेऑफच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडले आहेत. पंजाबचा संघ गुणतालिकेमध्ये आठव्या स्थानावर आहे. तरीही पंजाबच्या प्ले ऑफ मध्ये पोहोचण्याच्या आशा जिवंत आहेत. त्यामुळे आजचा सामना कोण जिकंतय हे बघणं महत्वाचे ठरेल
अशी असेल टीम…
दिल्ली कॅपिटल्स –
डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), फिलिप सॉल्ट, मिचेल मार्श, रोव्हमन पॉवेल/अॅनरिक नारखिया, अमन हकीम खान, अक्षर पटेल, प्रवीण दुबे, कुलदीप यादव, इशांत शर्मा, खलील अहमद, मुकेश कुमार आणि मनीष पांडे
पंजाब किंग्ज –
प्रभसिमरन सिंग, शिखर धवन (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टन, जितेश शर्मा, सॅम करण, सिकंदर रझा, शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, ऋषी धवन,राहुल चहर, अर्शदीप सिंग आणि कागिसो रबाडा