मुंबई – रणवीर सिंग हा सध्या आपल्या इंडस्ट्रीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक आहे. चाहत्यांना त्याच्या चित्रपटांमध्ये त्याला नेहमीच वेगळ्या भूमिकेत पाहायला आवडते आणि प्रत्येक वेळी त्याचा चित्रपट प्रदर्शित झाला की, चाहते त्याच्या अभिनयाला दाद देत असतात.रणवीरकडे सध्या अनेक रोमांचक चित्रपट आहे. पण सर्वाधिक चर्चेत असलेला चित्रपट म्हणजे जयेशभाई जोरदार. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चाहते त्याच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
यातच रणवीर काल एक कार्यक्रमाला हजेरी लावली यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना जयेशभाई जोदार यांच्याबद्दल तो बोलला. त्याला मीडियाने या चित्रपटाबाबत प्रश्न विचारले रणवीर म्हणाला,”ऐसी पिक्चर है, रुलाएगी नहीं तो पैसा वापस” असे उत्तर दिले. “जयेशभाई’चे शूटिंग पूर्ण झाले असून हा चित्रपट 13 मे रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटामधून दाक्षिणात्य अभिनेत्री शालिनी पांडे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तसेच चित्रपटाचे दिग्दर्शन दिव्यांग ठक्करने केले आहे.
वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास रणवीर सिंह “सूर्यवंशी’मध्येही झळकणार आहे. यात त्याच्यासोबत अक्षय कुमार, अजय देवगण आणि कतरिना कैफ मुख्य भूमिका साकारत आहे. याशिवाय त्याचा स्पोर्टस ड्रामा “83′ हा चित्रपटाही झळकणार आहे.. या मल्टीस्टार चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खानने केले आहे.