पुणे – ट्रेसेन्ट सिस्टिम्स या कंपनीचे उदघाटन रविवारी दैनिक प्रभातचे सरव्यवस्थापक बी. स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले. ट्रेसेन्ट सिस्टिम्स ही कंपनी सॉफ्टवेअर क्षेत्रात काम करणार आहे. या प्रसंगी गिट्स फूडचे व्यवस्थापकीय संचालक एम. ए. तेजानी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी, ट्रेसेन्ट सिस्टिम्सच्या संचालिका शकीला शेख यांनी सर्वांचे आभार मानले.
ट्रेसेन्ट सिस्टिम्सच्या उदघाटन समारंभास फिरोज शेख, प्रशांत कुलकर्णी, उज्वल झंवर, अमित देशमुख, उमेश देसाई, आसिफ शेख, श्रीनिवास चव्हाण, आरती सोपल आदींची उपस्थिती लाभली होती.