मुंबई – बॉलीवूड अभिनेता जॉन अब्राहमच्या आगामी “सत्यमेव जयते-2′ चित्रपटाची चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. हा चित्रपट पुढील आठवडयात चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. यात जॉन अब्राहमने तब्बल तीन भूमिका साकारल्या आहेत. यात जॉनसह दिव्या खोसला कुमारने मुख्य भूमिका साकारली आहे.
या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच रिलीज करण्यात आला होता, ज्याला चाहत्यांनी चांगला रिस्पॉन्स दिला. आता चित्रपटातील “कुसु कुसु’ हे गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. या गाण्यात अभिनेत्री नोरा फतेहीने आपल्या डान्सचा जलवा दाखविला आहे. क्रीम शिमरी ड्रेसमध्ये नोरा खूपच हॉट दिसत आहे.
या गाण्यात नोरा पुन्हा एकदा बेले डान्स करताना पाहावयास मिळत आहे. नोरा ही नेहमीप्रमाणे आपल्या जबरदस्त डान्स मुव्सने चाहत्यांची मने जिंकण्यात यशस्वी झाल्याचे दिसत आहे. हे गाणे झारा खान आणि देव नेगी यांनी गायीले असून तनिष्क बागचीने हे गाणे लिहिले आहे.
दरम्यान, “सत्यमेव जयते-2’मध्ये जॉन अब्राहम, दिव्या खोसला कुमार, राजीव पिल्लई, साहिल वैध आणि अनूप सोनी यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन मिलाप झावेरी यांनी केले आहे.