मुंबई – करोना महामारीमुळे काळ मोठा कठीण आला आहे. रोजच दु:खद बातम्या समोर येत आहेत. असे असताना आज मंनोरंजन क्षेत्रावर शोककळा पसरल्याचे वृत्त समोर आले आहे. जीव झाला येडापिसा’ या लोकप्रिय मालिकेतील ज्येष्ठ अभिनेते हेमंत जोशी यांचे करोनामुळे निधन झाले आहे. त्यांच्या निधनानंतर अनेक कलाकारांनी दु:ख व्यक्त केले आहे.
https://www.instagram.com/p/CPGEU0XJ-2s/?utm_source=ig_web_copy_link
जीव झाला येडापिसा’ या लोकप्रिय मालिकेत हेमंत जोशी यांनी ‘भावे’ ही भूमिका साकारली होती. मालिका, चित्रपटांसह अनेक नाटकांमध्ये काम केले होते. ‘नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे’, ‘टेंडल्या’, ‘बालगंधर्व’ अशा अनेक सिनेमांत ते दिसले. ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतही त्यांनी काम केलं होते.
अभिनेत्री सुमेधा दातारने आपल्या इन्स्टाग्रामवर हेमंत यांचा फोटो शेयर करत भावुक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये ‘भावपूर्ण श्रद्धांजली” असं लिहायला मनच धजत नाहीये. तर अभिनेता सुप्रीत निकम यानेही त्यांच्या निधनावर भावुक पोस्ट लिहिली आहे. आज तुमच्या रूपाने मी माझा एक मित्र गमावला आहे. कारण वडीलधारी असूनही तुम्ही जवळच्या मित्रानपेक्षा कमी नव्हता.