कोल्हापुरात दोन सेवा सोसायटीत 97 लाखांचा घोटाळा

कोल्हापूर – कोल्हापूर जिल्ह्यातील सावर्डे (ता. हातकणंगले) येथील शिवक्रांती विविध कार्यकारी सेवा संस्थेत 36 लाख 13 हजार व दत्त विकास सेवा संस्थेत 61 लाख 30 हजार 627 रुपयांचा घोटाळा केल्याचे उघडकीस केल्याचे लेखापरीक्षण अहवालात उघड झाले आहे.

यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून याप्रकरणी वडगाव बाजार समिती संचालक नितीन विष्णू चव्हाण, सुरेखा चव्हाण, दोन्ही संस्थेचे सचिव संतोष गुलाबराव पाटील यांच्यासह 32 जणांवर पेठवडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी लेखापरीक्षक अनिल पैलवान, रघुनाथ भोसले यांनी फिर्याद दिली. हा गुन्हा आर्थिक गुन्हे अन्वेषणकडे वर्ग करण्यात आला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.