नागपूर : रेल्वेने दिवाळी आणि छट पूजेसाठी आपल्या मूळ शहरात, गावाकडे जाणाऱ्यांसाठी ९६ विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.सणासुदीच्या काळात प्रवाशांची संख्या वाढत असते. नियमित गाड्यांना होणारी गर्दी लक्षात घेऊन दिवाळी आणि छट या सणांमध्ये लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई – दानापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – आसनसोल साप्ताहिक विशेष, लोकमान्य टिळक टर्मिनस- संत्रागाची साप्ताहिक विशेष आदी मार्गावर ९६ विशेष गाड्या चालवण्यात येत आहेत.
लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई – दानापूर विशेष गाडी २२ ऑक्टोबर ते ११ नोव्हेंबर २०२४ पर्यंत लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून दररोज १०.३० वाजता सुटेल आणि दानापूर येथे दुसऱ्या दिवशी सायंकाळी ६.४५ वाजता पोहोचेल. दानापूर – लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई विशेष गाडी २३ ऑक्टोबर ते १२ नोव्हेंबरपर्यंत दानापूर येथून दररोज रात्री साडे नऊ वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे तिसऱ्या दिवशी पहाटे ४.५० वाजता पोहोचेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – आसनसोल साप्ताहिक विशेष २१ ऑक्टोंबर ते ११ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत दर सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ११.०५ वाजता सुटेल आणि आसनसोल येथे तिसऱ्या दिवशी अडीच वाजता पोहोचेल.
आसनसोल – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साप्ताहिक विशेष गाडी २३ ऑक्टोंबर ते १३ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत दर बुधवारी आसनसोल येथून रात्री नऊ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे तिसऱ्या दिवशी सकाळी ८.१५ वाजता येथे पोहोचेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – गोरखपूर साप्ताहिक विशेष गाडी २२ ऑक्टोबर ते ११ नोव्हेंबर पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून दररोज रात्री १०.३० वाजता सुटेल आणि गोरखपूर येथे तिसऱ्या दिवशी सकाळी ८.२० वाजता पोहोचेल.
गोरखपूर- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साप्ताहिक विशेष गाडी २४ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर पर्यंत दररोज गोरखपूर येथून दुपारी २.३० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे तिसऱ्या दिवशी रात्री १२.४० वाजता पोहोचेल. लोकमान्य टिळक टर्मिनस- संत्रागाची साप्ताहिक विशेष गाडी २९ ऑक्टोबर आणि ५ नोव्हेबर रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून रात्री १०.१५ वाजता सुटेल आणि संत्रागाची येथे तिसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजता पोहोचेल. संत्रागाची- लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष गाडी ३१ ऑक्टोबर आणि ७ नोव्हेंबर रोजी संत्रागाची येथून दुपारी ३.५० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी रात्री ११.४५ वाजता पोहोचेल.