जिल्ह्यात 955 जणांना डिस्चार्ज

करोना बळींची एकूण संख्या 1060

सातारा -जिल्ह्यात विविध रुग्णालयातून आणि करोना केअर सेंटरमधून शनिवारी संध्याकाळपर्यंत 955 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. तर 782 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. 

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण जिल्हा रुग्णालयातील 32, कराड 23, फलटण उपजिल्हा रुग्णालयातील 101, कोरेगाव 63, वाई 110, खंडाळा 68, रायगाव 80, पानमळेवाडी 67, मायणी 16, महाबळेश्‍वर 27, पाटण 27, दहिवडी 28, खावली 12, कृष्णा मेडिकल कॉलेजमधील 128 अशा एकूण 782 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहितीही डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.