देशात पाच वर्षात ९४२ स्फोट; राहुल गांधींचा दावा 

नवी दिल्ली – गडचिरोलीतील नक्षलवाद्यांनी केलेला हल्ला, उरी, पठाणकोट आणि पुलवामा सारख्या हल्ल्यांचा संदर्भ देत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. २०१४ नंतर ९४२ स्फोट देशात झाल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.

पंतप्रधान मोदी एका भाषेत म्हणाले होते कि, २०१४ नंतर भारतातून स्फोटांचे आवाज येणे बंद झाले. मोदींच्या या वक्तव्यावर राहुल गांधींनी टीका केली आहे. ते म्हणाले, पंतप्रधानांना आपले उघडून ऐकण्याची गरज आहे. २०१४ नंतर उरी, पठाणकोट, पुलवामा आणि गडचिरोलीतील नक्षलवाद्यांनी केलेला हल्ल्यासह ९४२ मुख्य स्फोट झाले आहेत, असे राहुल गांधींनी सांगितले.

दरम्यान, महाराष्ट्र दिनीच गडचिरोलीतील नक्षलवाद्यांनी जवानांच्या ताफ्यावर आयईडी स्फोटकांद्वारे हल्ला केला होता. या हल्ल्यात १५ जवान शहीद झाले होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.