सातारा -जिल्ह्यातील विविध रुग्णालये, करोना केअर सेंटर व डीसीएचसीमध्ये उपचार घेतलेल्या 94 नागरिकांना शुक्रवारी घरी सोडण्यात आले असून 294 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
सातारा येथील जिल्हा रुग्णालयातील 12, कराड उपजिल्हा रुग्णालयातील 21, फलटण उपजिल्हा रुग्णालयातील 20, कोरेगावमधील 12, वाईतील 13, खंडाळा येथील 31, रायगावमधील सात, पानमळेवाडीतील दोन, महाबळेश्वरमधील पाच, दहिवडीतील 21, खावलीतील 59, तळमावलेतील सात, म्हसवडमधील 11, तरडगावातील 25 व कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजमधील 48, असे एकूण 294 जणांच्या घशातील स्रावांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत.
करोनाची सद्य स्थिती
घेतलेले एकूण नमुने – 244404
एकूण बाधित – 50755
घरी सोडण्यात आलेले – 48172
मृत्यू – 1706
उपचारार्थ रुग्ण – 877