नवी दिल्ली: मूलभूत आणि औद्योगिक कार्यदलामध्ये सुधारणा करण्यासाठी एमईएस म्हणजेच सैनिकी अभियांत्रिकी सेवेतली 9300 पेक्षा जास्त पदे रद्द करण्याच्या प्रस्तावाला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मान्यता दिली.
सशस्त्र दलाच्या संरक्षण खर्चामध्ये संतुलन राखण्यासाठी आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी कोणत्या उपाययोजना करणे आवश्यक आहे, हे पाहण्यासाठी लेफ्टनंट जनरल शेकाटकर यांच्या अध्यक्षतेखाली एक तज्ज्ञांची समिती नियुक्त करण्यात आली होती. या समितीने केलेल्या शिफारसी लक्षात घेऊन सैनिकी अभियांत्रिकी सेवेतली ही पदे रद्द करण्यात आली आहेत.
तज्ज्ञांच्या समितीने केलेल्या शिफारसींनुसार सैनिकी अभियांत्रिकी सेवेच्या कार्यविभाजनाची फेररचना करण्यात आली असून आता अशंतः कामे विभागातल्या कर्मचारी वर्गांकडून करून घेण्यात येणार आहेत; तर जी कामे बाहेरून करून घेतली जाऊ शकतात, ती पदे ठेवण्याची आवश्यकता नाही.
लेफ्टनंट जनरल शेकाटकर समितीने केलेल्या शिफारसींप्रमाणे मूलभूत आणि औद्योगिक कर्मचारी वर्गाच्या एकूण 13,157 पदांपैकी 9,304 पदे रद्द करण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे.