नगर -जिल्ह्यात आज 573 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 29 हजार 85 इतकी झाली असली, तरी जिल्ह्यात आज 922 नव्या करोनाबाधितांची भर पडली आहे. त्यामुळे बाधितांची संख्या 34 हजार 715 इतकी झाली असून, 5 हजार 81 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 293, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 330 आणि अँटिजेन चाचणीत 299 रुग्ण बाधित आढळले. यामध्ये मनपा 185, संगमनेर 3, राहाता 1, पाथर्डी 2, श्रीरामपूर 14, नेवासे 23, श्रीगोंदा 4, पारनेर 6, अकोले 15, राहुरी 8, कोपरगाव 7, जामखेड 2, मिलिटरी हॉस्पिटल 21, इतर जिल्हा 2, अशा रुग्णांचा समावेश आहे.
खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या 330 रुग्णांची नोंद एकूण रुग्णसंख्येत घेण्यात आली. यामध्ये मनपा 113, संगमनेर 8, राहाता 50, पाथर्डी 4, नगर ग्रामीण 17, श्रीरामपूर 48, नेवासे 10, श्रीगोंदा 8, पारनेर 14, अकोले 9, राहुरी 23, शेवगाव 1, कोपरगाव 16, जामखेड 2 आणि कर्जत 7 अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटिजेन चाचणीत आज 299 जण बाधित आढळून आले. यामध्ये मनपा 19, संगमनेर 21, राहाता 20, पाथर्डी 26, नगर ग्रामीण 15, श्रीरामपूर 18, कॅन्टोन्मेंट 4, श्रीगोंदा 22, पारनेर 10, अकोले 16, राहुरी 41, शेवगाव 38, कोपरगाव 13, जामखेड 26 आणि कर्जत 10, अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज 573 रुग्णांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये मनपा 169, संगमनेर 50, राहाता 19, पाथर्डी 19, नगर ग्रामीण 25, श्रीरामपूर 26, कॅन्टोन्मेंट 5, नेवासे 51, श्रीगोंदा 42, पारनेर 28, अकोले 16, राहुरी 23, शेवगाव 45, कोपरगाव 27, जामखेड 11, कर्जत 16, मिलिटरी हॉस्पिटल 1, अशा रुग्णांचा समावेश आहे.
नगर करोना अपडेट
बरे झालेली रुग्ण संख्या : 29,085
उपचार सुरू असलेले रूग्ण : 5,081 आजपर्यंतचे मृत्यू : 549
एकूण रूग्ण संख्या : 34,715