ग्रामसभा घेऊन प्रभागनिहाय आरक्षण सोडती काढण्यास सुरवात
राजगुरूनगर – खेड तालुक्यातील 91 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षण सोडती ग्रामसभा घेऊन काढण्यास सुरवात झाली आहे. बुधवार (दि. 22) पर्यंत तालुक्यातील 91 ग्रामपंचायतीच्या प्रभागनिहाय आरक्षण सोडती पूर्ण होणार असल्याची माहिती तहसीलदार सुचित्रा आमले यांनी दिली.
जुलै ते डिसेंबर 2020 पर्यत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका निवडणूक आयोगाने जाहिर केल्या. त्यानुसार महसूलने ग्रामपंचायतीच्या वॉर्डरचना केल्या आहेत. प्रभागरचना आणि आरक्षण सोडती कार्यक्रम ग्रामसभा घेऊन ग्रामस्थांसमोर काढण्यात येणार आहे. सरपंचपदाचे आरक्षण जाहीर न झाल्याने ग्रामस्थांमध्ये उत्सुकता आहे.
लोकनियुक्त सरपंचपदाची निवडणूक महाविकास आघाडी सरकारने रद्दबादल ठरविल्याने सदस्यांमधून सरपंच होणार असल्याने गावपातळीवर गटतटाचे राजकारणाला वेग येऊ लागला आहे.
आरक्षण सोडतीसाठी संबंधित ग्रामसेवक, तलाठी आणि मंडलाधिकारी हरिदास सोनवणे, बाबा साळुंके, चेतनकुमार चासकर, सविता घुमटकर, विजय घुगे, सिताराम तुर्रे, विलास सोनवणे, सुनिल धर्माकाबंळे, राजेंद्र वाघ, दिपक मडके, एस. डी. गोडे, कृषी अधिकारी जी. आर. ठाकूर, विजय पडवळ, आर. बी. बारवे, नरेंद्र वेताळ, नंदकुमार वाणी, पंचायत समिती विस्तार अधिकारी जी. पी. शिंदे, एस. एन. महाकाळे, पी. एस. माकर, एस. बी. कारंडे, आर. बी. ढाकणे, एस. डी. थोरात यांची नियुक्ती केली आहे.
या ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहिर
खेड तालुक्यातील कुरकुंडी, किवळे, तळवडे, खराबवाडी, वासुली, वराळे, गोनवडी, चिबंळी, टाकळकरवाडी, बिबी, कडधे, चिंचोशी, कनेरसर, वाफगाव, आवंढे, घोटवडी, कुडे बुद्रुक, पाळु, आसखेड खुर्द, धामणगाव खुर्द, खरोशी, भोरगिरी, टोकावडे, कडुस, कोरेगाव बुद्रुक दोंदे, मेदनकरवाडी, शिंदे, कान्हेवाडी तर्फे चाकण, सांगुर्डी, मोई, कुरुळी, राक्षेवाडी, वरची भांबुरवाडी, खरपुडी खुर्द, आखरवाडी, खरपुडी बुद्रुक, रासे, निमगाव, पूर, विऱ्हाम, तोरणे बुद्रुक, शेलु, वाजवणे, नायफड या गावांच्या आरक्षण सोडती झाल्या.
आणखी तीन दिवस सोडत
सोमवारी (दि. 20) रानमळा, साबुर्डी, चांदुस, नाणेकरवाडी, बिरदवडी, वाकी खुर्द, गोलेगाव, मरकळ, पाडळी, पांगरी, तुकाईवाडी, रेटवडी, भोसे, चिंचबाईवाडी, वाकळवाडी, शिरगाव, अहिरे, शिवे. मंगळवारी (दि. 21) वडगाव नजिक खेड, वेताळे, चांडोली, सावरदरी, महाळुंगे, कान्हेवाडी बुद्रुक, मोहकल, धानोरे, चऱ्होली खुर्द, पिंपरी बुद्रुक, जैदवाडी, कमान, काळुस, जऊळके बुद्रुक, गोसासी, गडद, हेद्रूज; तर बुधवारी (दि. 22) केळगाव, ढोरे भांबुरवाडी, औदर, दावडी, आंबोली व वांद्रा येथील प्रभाग रचना आरक्षण सोडत होणार आहे.