जिल्ह्यातील 91 चारा छावण्यांना पावणेचार लाखांचा दंड

तालुकानिहाय आकडेवारी

जामखेड-27, कर्जत-7, शेवगाव-4, पारनेर-1, पाथर्डी-2, नगर-17, श्रीगोंदा-32, नेवासा-1 या तालुक्‍यातील छावण्यांना दंड झाला आहे.

जामखेड, श्रीगोंदा तालुक्‍यांतील छावण्यांमध्ये सर्वाधिक अनियमितता

जिल्ह्यात दुष्क़ाळी परिस्थीतीत पशुधन वाचविण्यासाठी प्रशासनाकडून चारा छावण्या सुरु करण्यात आल्या. मात्र पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांच्या मतदार संघात व श्रीगोंदा तालुक्‍यातच सर्वात जास्त छावण्यामध्ये अनियमितता आढळून आल्याचे आकडेवारी मध्ये समोर आले आहे.

 

नगर – दुष्काळी भागात पाणी व पशुधनासाठी चारा उपलब्ध करण्यासाठी जिल्हाप्रशासनाकडून चारा छावण्या सुरु करण्यात आल्या आहेत. या छावण्यामध्ये जनावरांना नियमित चारा मिळतो का? याची अचानक तपासणी करण्यात आली. त्याचा अहवाल जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना सादर करून त्यांनी जिल्ह्यातील 91 चारा छावण्यांना 3 लाख 79 हजार 895 रुपयांचा दंड ठोठावला आहे.

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, जिल्हा परिषदेचे अधिकारी, कृषीविभागाचे अधिकारी यांच्या पथके तैनात केली होती. या पथकाने जिल्ह्यात सुरु असलेल्या छावण्यांना अचानक भेट देवून त्याबाबत अहवाल जिल्हाधिकारी यांना सादर केला. त्यानुसार 91 चारा छावण्यांना पावनेच्यार लाखांचा दंड करण्यात आला आहे. दुष्काळी भागात पाणी व जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देण्यासाठी चारा छावण्यांना मंजूरी देण्यात आली आहे.

जिल्ह्यात एकूण मार्च अखेर 504 चारा छावण्या सुरु होत्या. आता मात्र जिल्हात 234 चारा छावण्या सुरु असून, 1 लाख 34 हजार 38 जनावरे आहेत.
या जनावरांना छावणी मध्ये दिले जाणाऱ्या पाण्याचे नमुणे तपासणी केली जाते का?, दाखल जनावरांची पशुवैद्यकीय अधिकाऱ्यामार्फत नियमित पणे तपासणी होती का?, व आवश्‍यक ते औषधोपचार केले जाते का, जनावरांचे लसीकरण झाले आहे की नाही., नकाशा प्रमाणे छावणीची रचना केली आहे काय?. आजारी जनावरांसाठी स्वंतत्र व्यवस्था करण्यात आली आहे का?. छावणी मालकाने स्वतंत्र विद्युत मिटर घेतले आहे का?., प्रत्येक जनावरांची व चारा वाटप ठिकांनचा व्हिडीओ चित्रीकरण होण्यासाठी सी.सी.टीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे का?., छावणी परिसरात धूम्रपाण होत असल्याचे आढळूण आले आहे का तसेच जनावरांना पशुखाद्य दिले जातेका?, शासनाने ठरवून दिलेल्या प्रमाणे चारा वाटप केली जाते का? याबाबत तपासणी करण्यात आल्या होत्या.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.