मुंबई – नव्वदच्या दशकात सर्वांना घायाळ करणारी बिकिनी गर्ल म्हणून प्रसिद्ध असणारी अभिनेत्री लवकरच बॉलिवूडमध्ये पुनरागमन करणार आहे. अभिनेते ऋषी कपूर यांच्यासोबत ९० च्या दशकात बीचवर बिकिनी परिधान करून आपल्या कातिल अंदाजाने प्रेक्षकांना घायाळ करणारी अभिनेत्री सोनम सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. एका मुलाखतीतील या अभिनेत्रीने आपल्या प्रवासाबाबतचे अनेक खुलासे केले आहेत.
मला खूप आधीच बॉलिवूडमध्ये परतायचे होते परंतु काही कारणामुळे ते शक्य झालं नाही असं सोनम म्हणते. त्रिदेव या चित्रपटातील ओये..ओये हे गाणं आजही खूप प्रसिद्ध आहे आणि प्रसिद्ध आहे त्यातील सोनमचा अंदाज. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सोनमने आपल्या लग्नामुळे बॉलिवूड सोडल्याचा म्हंटल आहे.
View this post on Instagram
यशाच्या शिखरावर असताना सोनमने बॉलिवूडला अलविदा केल्याने अनेकांना आश्चर्य वाटले होते. त्यावेळी सोनमचे नाव अबू सालेमशी देखील जोडल्याने अनेक प्रकारच्या चर्चांना उधाण आले होते. त्रिदेवचे निर्माते राजीव राय यांच्याशी सोनमने विवाह केला होता आणि ती परदेशात राहत होती.परंतु त्यानंतर तिच्या पतीवर हल्ला झाल्याचे देखील तिने मुलाखतीत सांगितले. अंडरवर्ल्ड डॉनशी संबंध असल्याने पतीसोबत सोनमचा घटस्फोट झाल्याचे देखील बोलले जात आहे.
वयाच्या १४ व्या वर्षी सोनमने बॉलिवूडमध्ये काम करायला सुरुवात केली होती तर १७ व्या वर्षी तिने बोलीववूड सोडले होते. आता ती ५० वर्षांची असून लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवरील एका वेब सिरीजद्वारे सोनम बॉलिवूडमध्ये पुनरागमन करणार आहे.