पुणे(प्रतिनिधी) -ओएलएक्सवर सोपा आणि खुर्ची विकणे एका महिलेला भारीच महागात पडले. खरेदी करण्याचा बहाणा करत एका सायबर भामट्याने महिलेला 90 हजाराचा गंडा घातला आहे. याप्रकरणी एका 39 वर्षीय महिलेने वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानूसार अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार संबंधीत महिलेने घरातील जुना सोफा आणी खुर्चीचे फोटो ओएलएक्सवर टाकले होते. तीला एका भामट्याने कॉल करुन ते खरेदी करायचे असल्याचे सांगितले. पैसे ऑन लाईन पाठवून देतो असे सांगत तीला एक क्यूआर कोड पाठवला. हा कोड महिलेने स्कॅन केल्यावर तीच्या खात्यातून 50 हजार कट झाले. तीने फोन करुन भामट्याला याची माहिती देताच भामट्याने आणखी 40 हजार रुपये काढून घेतले. यानंतर भामट्याने फोन बंद ठेवला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर महिलेने तक्रार दाखल केली. याप्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक सलीम चाऊस करत आहेत.