न्यूयॉर्क – जगभरात कोरोनामुळे अर्थव्यवस्थेची गणिते बदलली. अनेक जणांचे रोजगार गेले. सध्या अमेरिकेत सुट्यांचा कालावधी सुरु होत आहे. न्यूयॉर्कमधील एका कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने तीन मिनिटांमध्ये 900 जणांना नोकरीवरुन काढून टाकल्याचा प्रकार समोर आला होता.
बेटर डॉट कॉम नावाच्या कंपनीमधून ही कर्मचारी कपात करण्यात आले आहेत. डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार या कंपनीचे सीईओ विशाल गर्ग यांनी मागील बुधवारी कर्मचाऱ्यांसोबत झूम कॉल केला होता. याच बैठकीत गर्ग यांनी 900 कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकले त्यामुळे. विशाल गर्ग भारतीय वंशाचे असल्याने आपल्याकडेही या बातमीची चांगलीच चर्चा रंगली होती.
मात्र त्यांना टीकेचा सामना करावा लागला. पण गर्ग यांनी माफी मागितली असून “माझ्या लक्षात आलं आहे की, ज्या पद्धतीने मी संवाद साधला त्यामुळे ही वाईट परिस्थिती अजूनच बिघडली”, असं विशाल गर्ग यांनी पत्रात म्हटलं आहे.
दरम्यान, कंपनीने कॉस्ट कटिंगचा विचार करुन मोठ्या संख्येने कर्मचारी कपात केली. कंपनी एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात करणार आहे याची कोणतीही पूर्वसूचना किंवा कल्पना देण्यात आली नव्हती.