वॉशिंग्टन – अमेरिकेतील फायजर आणि मॉडर्ना या लसीसंदर्भात चांगली बातमी समोर आली आहे. अमेरिकेत करण्यात आलेल्या संशोधन अहवालानुसार या दोन्ही लसींचा पहिला डोस चांगलाच परिणामकारक ठरला आहे.
अमेरिकेतील या संशोधनानुसार फायजर आणि मॉडर्ना या कोरोना लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर 15 दिवसांनी करोना पॉझिटीव्ह येण्याची शक्यता 90 टक्के कमी आहे. या लसीच्या अमेरिकेतील 4000 नागरिकांवरील वापरावरुन संशोधन करण्यात आले.
या 4 हजार रुग्णांमध्ये आरोग्य विभागातील फ्रंटलाईन वर्करचाही लसीकरण केलेल्यात समावेश आहे. सीडीसीचे संचालक रोशल वेलेंस्की यांनी म्हटले की, लसीकरणाचा आपला प्रयत्न यशस्वी होत असल्याचे या संशोधनातून दिसून येते.
हे संशोधन 14 डिसेंबर 2020 से 13 मार्च 2021 या कालावधीत करण्यात आले. या संशोधनाचा निष्कर्ष सोमवारी जारी करण्यात आला. दोन्ही कंपन्यांनी या संशोधनासाठी क्लिनीकल ट्रायल्सच्या डेटाचाही उपयोग केला.
दरम्यान, भारतात फायजर आणि मॉडर्नाच्या लसीला मान्यता मिळाली नाही. देशात सीरम इंस्टीट्यूटची कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही लस वापरण्यात येत आहे.