सांगली-कोल्हापूर बायपास महामार्गासह ९ मार्ग बंद

सांगली – शिरोळ तालुक्यात कृष्णा, वारणा, पंचगंगा व दुधगंगा नदीच्या पाणी पातळी झपाट्याने वाढ झाली आहे. उदगाव येथील सांगली-कोल्हापूर बायपास महामार्ग पहाटे ४ वाजता पाण्याखाली गेला आहे.

 सद्या कृष्णा नदीच्या पाण्यामुळे उदगाव येथील मोठ्या ओढ्यावर असलेल्या सांगली कोल्हापूर बायपास महामार्ग बंद झाला आहे.

 या मार्गांवरील वाहतूक पूर्णत: बंद

● कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर पाणी; वाहतूक पूर्णत: बंद
● कसबा बावडा-शिये रस्ता बंद
● मलकापूर ते रत्नागिरी मार्गावर येल्लूरजवळ पाणी
● बर्कीजवळ पुलावर पाणी; संपर्क तुटला
● मालेवाडी-सोंडोली येथील पूल वाहतुकीस बंद
● उखळू, खेडे, सोंडोलीकडे जाणार्‍या रस्त्यावर पाणी
● कडवी पुलावर पाणी; मलकापूर ते शिरगाव मार्ग बंद
● करंजफेण, माळापुढे, पेंढाखळे वाहतूक थांबवली
● करुंगळे ते निळे व कडवे ते निळे मार्ग बंद
● निलजी, ऐनापूर बंधार्‍यावर पाणी; वाहतूक बंद
● मालेवाडी ते सोंडोली रस्त्यावर पाणी
● गारगोटी-गडहिंग्लज रस्ता वाहतुकीसाठी बंद
● मुरगूड ते कुरणी हा बंधरा पाण्याखाली,
● निढोरीमार्गे कागल या रस्त्यावरून वाहतूक सुरू
● सुरुपली ते मळगे बंधारा पाण्याखाली
● सोनगे ते बानगे मार्गावरून वाहतूक सुरू
● बस्तवडे ते आणूर बंधार्‍यावर पाणी
● पर्यायी सोनगे, बानगेमार्गे वाहतूक सुरू
● कोवाडे, नांगनूर, निलजी, ऐनापूर या बंधार्‍यांवर पाणी

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.