भोर -भोर तालुक्यात करोनाचा संसर्ग होणाऱ्याची संख्या वाढतच चालली आहे. भोर तालुक्यात शुक्रवारी (दि. 7) 9 जणांचे करोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तालुक्यातील वडगाव 1, संगमनेर 1, जेधेवाडी 1, धुमाळनगर (भोर) 1, जोगवडी 1, खोपी 4 अशा एकूण 9 जणांचा करोनाबाधितांमध्ये समावेश आहे. अशी माहिती भोर तालुका पंचायत समितीचे गट विकास अधिकारी विशाल तनपुरे व डॉ. सूर्यकांत कऱ्हाळे यांनी दिली.
भोर तालुक्यात आजपर्यंत करोनाबाधितांची संख्या 258 वर पोहोचली आहे. यातील 168 जणांनी करोनावर मात केली आहे. 84 करोनाबाधित रुग्णांवर भोर व नसरापूर येथे उपचार सुरू आहेत. आजअखेर करोनामुळे 7 जणांना जीव गमवावा लागला आहे.