झारखंडमध्ये वीज कोसळून 9 ठार

नवी दिल्ली – झारखंड राज्यामध्ये शुक्रवारी मान्सून सक्रिय होण्यापूर्वीच वीज कोसळून झालेल्या दुर्घटनेत 9 जण ठार झाले आहेत. राज्यातील पलामू, लातेहार, लोहरदगा, गुमला, रांचीमधील लोकांचा मृतांमध्ये समावेश आहे.

लातेहारमध्ये सर्वाधिक तीन लोक ठार झाले आहेत. बुधवारीही अशाच प्रकारच्या दुर्घटनेत सहाजण मृत्युमुखी पडले. गेल्या दोन दिवसात वीज कोसळून मृत झालेल्या बळींचा आकडा आता 15 वर गेला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.