काबुल :अफगाणिस्तानची राजधानी काबुल रविवारी पुन्हा एकदा भीषण बॉम्बस्फोटाने हादरले आहे. शहरात झालेल्या बॉम्बस्फोटात नऊ जणांचा मृत्यू आणि २० हून अधिक जखमी झाले.
अफगाणिस्तानच्या एका वृत्तवाहिनीने याविषयी माहिती दिली आहे. गृहमंत्री मसूद अंदाराबी यांनी या स्फोटाची पुष्टी केली आहे. काबूलमध्ये झालेल्या स्फोटात 9 जणांचा मृत्यू आणि 20 जण जखमी असल्याचे ते म्हणाले.