कंटेनर-क्रूझरच्या भीषण अपघातात 9 ठार !

विजापूर-सिंदगी महामार्गावरील दुर्घटना : 5 जण गंभीर जखमी

सोलापूर: विजापूर-सिंदगी राज्य महामार्गावर कंटेनर आणि क्रूझर यांच्यात समोरासमोर धडक होवू झालेल्या भीषण अपघातात 9 जण जागीच ठार, तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात आज शुक्रवार (दि. 22 मार्च) पहाटे जिल्ह्यातील चिक-सिंदगी गावाजवळ झाला. जखमींना सिंदगीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, जखमींची प्रकृती चिंताजनक आहे.

भीषण अपघातातील मृत तरुण हे होळीच्या सुटीनिमित्त क्रूझरने गोव्याला गेले होते. हा अपघात गोव्याहून परत गावाकडे येत असताना झाला. क्रुझर वाहनचालक श्रीनाथ इस्वरप्पा नालवार (वय 30), सागर शंकरप्पा दोड्‌डमनी (25), चांदबादशा मशकसाब मुजावर (26), अमरीश लक्षमण डोरे (37), युनूस पटेल (27),अजीम अब्दुलरहेमान शेख (25), शाकीर अब्दुलहमीद शेख (28), गुरुराज साबण्णा हकीम (32),मसोफ कडबूर (27) अशी मृतांची नावे आहेत. तर आकाश दोरे , मल्लिकार्जुन जमादार, मंजूर कडबूर, सद्दाम अशी गंभीर जखमी असलेल्यांची नावे आहेत. हे सर्वजण गुलबर्गा जिल्ह्यातील चित्तापूर शहरातील रहिवाशी आहेत. क्रुझरमध्ये 15 जण होते असे सांगण्यात आले.

या दुर्घटनेमुळे सिंदगी-विजापूरला जाणारे मार्ग बंद करण्यात आल्याने वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती. सिंदगी पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी तातडीने धाव घेऊन मदत व बचावकार्य सुरू केले. दरम्यान, एका वर्षांपूर्वी याच मार्गावर झालेल्या अपघातात 22 जण ठार झाले होते. त्यानंतर ही दुसरी भीषण दुर्घटना आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.