सातारा (प्रतिनिधी) – जिल्ह्यात सोमवारी 898 जणांचे अहवाल करोनाबाधित आले आहेत. तर 35 करोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
35बाधितांचा मृत्यू
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णलयात साकर्डी ता. कराड येथील 72 वर्षीय पुरुष, व्यंकटपुरा पेठ सातारा येथील 64 येथील पुरुष, रहिमतपूर येथील 65 वर्षीय पुरुष, नित्रळ सातारा येथील 80 वर्षीय पुरुष, अतित येथील 86 वर्षीय पुरुष, नुने सातारा येथील 70 वर्षीय पुरुष, सदरबझार सातारा येथील 58 वर्षीय पुरुष, पंताचा गोट सातारा येथील 84 वर्षीय महिला, शाहूपुरी सातारा येथील 76 वर्षीय पुरुष, सासुर्वे कोरेगाव येथील 53 वर्षीय महिला, शनिवार पेठ सातारा येथील 43 वर्षीय महिला, मेढा ता. जावळी येथील 75 वर्षीय पुरुष, करंजे सातारा येथील 69 वर्षीय पुरुष, शेदुरजणे ता. कोरेगाव येथील 88 वर्षीय पुरुष, चाफळ येथील 71 वर्षीय पुरुष, कुमठे ता. खटाव येथील 63 वर्षीय महिला. तसेच जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पीटलमध्ये औंध ता. खटाव येथील 67 वर्षीय महिला, विडणी ता. फलटण येथील 48 वर्षीय महिला, शाहूपुरी सातारा येथील 69 वर्षीय पुरुष, धनकवडी पुणे येथील 74 वर्षीय महिला, कोरेगाव येथील 72 वर्षीय पुरुष व 65 वर्षीय महिला, म्हसवड ता. माण येथील 60 वर्षीय महिला, 72 वर्षीय महिला व 82 वर्षीय पुरुष, माण येथील 75 वर्षीय महिला, पळशी ता. माण येथील 77 वर्षीय महिला, कडेगाव सांगली येथील 51 वर्षीय पुरुष, भरतगाव सातारा येथील 85 वर्षीय पुरुष, कोरेगाव येथील 75 वर्षीय पुरुष, नवाडी ता. पाटण येथील 82 वर्षीय पुरुष, कराड येथील 70 वर्षीय पुरुष, शाहूनगर गोडोली सातारा येथील 55 वर्षीय पुरुष, कुडाळ ता. जावळी येथील 73 वर्षीय पुरुष, हुमगाव ता. जावळी येथील 80 वर्षीय पुरुष अशा एकूण 35 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी सांगितले.
घेतलेले एकूण नमुने – 57,369
एकूण बाधित – 25,476
घरी सोडण्यात आलेले – 15,594
मृत्यू – 725
उपचारार्थ रुग्ण – 9,157