राज्यात एकाच दिवसांत 87 पोलीस पॉझिटिव्ह

मुंबई: राज्य पोलीस दलातील करोनाबाधित पोलिसांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होताना दिसत आहे. आजच्या दिवसांत तब्बल 87 पोलीस करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. आतापर्यंत एकूण 1758 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली आहे.

काल एका दिवसात पाच पोलिसांना करोनाची लागण झाली होती, तर आज (रविवार 24 मे) 87 पोलिसांना लागण झाली आहे. एका दिवसांत 200 पोलीस बरे होऊन घरी परतले आहेत, ही दिलासादायक बाबही आहे.

आतापर्यंत 183 अधिकारी आणि 1575 पोलीस कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली आहे. करोनाची लक्षण असलेल्या पोलिसांची संख्या मोठी आहे. 131 अधिकारी आणि 936 अशा एकूण 1067 पोलिसात लक्षण दिसून येत आहेत. आतापर्यंत 18 करोनाग्रस्त पोलिसांचा मृत्यू झाला आहे. कालच्या दिवसात दोन पोलिसांचा मृत्यू झाला. यामध्ये ठाण्यातील श्रीनगर पोलीस स्टेशन येथील महिला कॉन्स्टेबलचा समावेश होता. तर 51 अधिकारी आणि 622 पोलीस कर्मचारी असे एकूण 673 जण बरे होऊन घरी परतले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.