पाटण (प्रतिनिधी) – मे महिन्याच्या अखेरीला पाणी टंचाई जाणवू लागल्याने पाटण तालुक्यातील 86 गावांचा संभाव्य पाणी टंचाईचे प्रस्ताव येथील प्रांत कार्यालयाकडे प्राप्त झाल आहे. सध्या चार टॅंकरव्दारे पाणी टंचाई असणाऱ्या तालुक्यातील गावांना पाणी पुरवठा केला जात असून प्रस्ताव प्राप्त झालेल्या गावांना पाणी पुरवठा करण्याचे आवाहन प्रशासनासमोर आहे.
संपूर्ण मे महिना व जूनच्या 15 तारखेपर्यंत कडक उन्हाळा भासणार असल्याने पाणीटंचाई अधिक भीषण होण्याची शक्यता आहे. माणसांबरोबरच जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पाटण तालुक्यातील संभाव्य पाणी टंचाईग्रस्त 86 गावांचा पाणी प्रस्ताव आला आहे.
यात कोकीसरे, किल्लेमोरगिरी, झाकडे, मालोशी, मुरुड, आबंळे, मेढोशी घोट, महिंद, गारवडे, सुतीरवाडी, केरळ, धडामवाडी, चाफळ, जाधववाडी. भोसगाव, गावडेवाडी, तामिणे, बनपूरी, आबंवडे, जिंती, भांबे, सातर, कारळे, काढणे, शिद्रुकवाडी, रामिष्टेवाडी, मस्करवाडी, चव्हाणवाडी,(धामणी) वाझोंळे, कुभांरगाव, काळगाव, नाटोशी, येराड, नुने, वेखंडवाडी, नाणेगाव, डावरी, कडवे बुद्रुक, वजरोशी, कोरीवळे, ढोरोशी, दूसाळे, ढेबेवाडी, कडवे बुद्रुक, सणबूर, रुवले, मणेरी, मद्रुंळकोळे खुर्द, तारळे, कुशी, कराटे, कुसवडे, काठी, चिखलेवाडी, गव्हाणवाडी, कामरगाव, आब्रंग, शिवदेंश्वर, टोळेवाडी, तारळे, (जगंलवाडी ) भुडकेवाडी, मेढेघर, सावरघर, पाणेरी, चौगलेवाडी, गोकुळ तर्फे हेळवाक, लेंडोरी घाण, कोळेकरवाडी, घोटील, काहीर, निगडे, पाचगनी, तारळे (घडगेमाळवस्ती) नाव, मालोशी, दिवशी बुद्रुक, कुसरुंड, आटोली, पाढंरपाणी, केळोली, गोवारे, काळगाव, धामणी, विहे या गावांचा समावेश आहे.