यंदा ध्वनिपातळी 86.2 डेसिबल; आवाजात घट

पुणे – गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत लक्ष्मी रस्त्यावरील 10 प्रमुख चौकांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत यंदा आवाजाच्या पातळीत घट झाली आहे. गेल्यावर्षीची ध्वनिपातळी 90.4 डेसिबल होती. यंदाच्या 86.2 डेसिबल इतकी नोंदवण्यात आली. महत्त्वाचे म्हणजे 2001 पासूनच्या ध्वनिपातळीमध्ये हे प्रमाण सर्वांत कमी असल्याचा निष्कर्ष “सीओईपी’ने काढला आहे.

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे अर्थात “सीओईपी’च्या पदव्युत्तर पर्यावरणशास्त्र संशोधन केंद्राच्या उपयोजित विज्ञान विभागाच्या विद्यार्थ्यांनी मिरवणुकीदरम्यान लक्ष्मी रस्त्यावरील 10 प्रमुख चौकांतील ध्वनिपातळी मोजली. डॉ. महेश शिंदीकर यांच्या मार्गदर्शनाखाली नागेश पवार, सतीश सुखबोटलावार, शुभम अलटे, निशिकांत कंधारे, सुमित शिंदे, ओंकार कामाजी, रुद्रेश हेगू, मंगेश भास्कर, भाग्येश सांखला, दिनेश गट्टूवार, गजानन बुचलवार, शुभम केवटे, प्रतीक दातीर, तुकाराम शिरसे, भागवत बिरादार, प्रकाश नागे, सुधीर तेलंगे, आशु राजपूत, प्रीतम बोडखे, बालाजी नावंदे या विद्यार्थ्यांनी ध्वनिमापन केले.

सन 2001 पासूनच्या आवाजाच्या पातळीचा आढावा घेतला असता, 2001 मध्ये सरासरी ध्वनिपातळी 90.7 डेसिबल होती. 2009 मध्ये ध्वनिपातळीत मोठी वाढ होऊन 102.6 डेसिबल झाली. त्यानंतर 2013 मध्ये ध्वनिपातळीने 2012 च्या ध्वनिपातळीचा (104.2 डेसिबल) विक्रम मोडीत काढून 114.4 डेसिबलचा विक्रम नोंदवला. त्यानंतर 2014 पासून ध्वनिपातळीत दरवर्षी घट होत असल्याचे दिसून आले आहे.

लक्ष्मी रस्त्यावरील प्रमुख दहा चौकांत चोवीस तासांमध्ये नोंदवण्यात आलेल्या ध्वनिपातळीत बऱ्याच वर्षांनी ध्वनिपातळीचे प्रमाण 90 डेसिबलच्या खाली आले. यंदा विद्यार्थी मोजणीचे काम करताना एकमेकांशी बोलताना ऐकू येईल इतकी बरी स्थिती होती.
– डॉ. महेश शिंदीकर

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)